Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

नरेगाच्या कामासाठी ७० हजाराची लाच घेणारा सरपंच जाळ्यात

पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले

तरनळीच्या सरपंचाविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – महात्मा गांधी नरेगाअंतर्गत विहिर मंजूर करून घेण्यासाठी त्यावर गटविकास अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी घेण्यासाठी गावातील चक्क सरपंचानेच लाच मागितल्याची घटना घडली आहे. केज तालुक्यातील तरनळी ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव प्रताप खेडकरला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी (दि.१३) सांयकाळी घडली आहे . घटनेने पंचायत समिती परिसरात खळबळ उडाली आहे.

शेअर ट्रेडींगच्या बहाण्याने जेष्ठाला गंडा – सविस्तर बातमी

केजमध्ये गटविकास अधिकारी व इतर अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या सह्या घेण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी तरनळीच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराने २३ डिसेंबर २०२५ रोजी तक्रार दिली होती. तक्रारदार व अन्य तिघांच्या शेतजमिनीत एमआरईजीएस योजनेंतर्गत जलसिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये, असा १ लाख रुपयांचा खर्च मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीच्या अनुषंगाने २३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात सरपंच खेडकर यांनी विहिरीच्या प्रस्तावावर सही करून बीडीओ व इतर अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी १० हजार व उर्वरित तिघांकडून प्रत्येकी २० हजार रुपये, असा ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने १ जानेवारीला सापळा रचला असता आरोपीने थेट रक्कम स्वीकारली नाही. त्यानंतर १३ जानेवारीला पंचायत समितीच्या पाठीमागील खेडकर यांच्या रूममध्ये लाचलुचपत पथकाकडून सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी तक्रारदाराकडून पंचासमक्ष ७० हजार रुपये स्वीकारताना सरपंचाला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी प्रशासनाकडून फिर्याद पोलिस निरीक्षक विजय हनुमंत वगरे यांनी दाखल केली. पुढील तपास बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान कवडे हे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×