जागेच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती
marathinews24.com
पुणे – सराईत गुन्हेगारासह तिघांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २०) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरमध्ये घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार जागेच्या वादातून हा खून झाल्याचे समजले आहे. शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.
भाजपच्या माजी खासदारांची तत्परता; अपघाती जखमीच्या मदतीला धावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे आणि इतर दोघे अशा तिघांनी मिळून शुभम सुभाष चव्हाण याचा खून केला आहे. रविवारी पहाटे साडेचार वाजताची ही घटना आहे. संतोषनगर, कात्रज याठिकाणी जागेच्या वादावरून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस तपास करीत आहेत.
असा झाला तरुणाचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटेच्या सुमारास शुभम संतोषनगर परिसरातून घरी जात असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे आणि इतर दोघां साथीदारांनी थांबून जागेच्या संदर्भात विचारणा केली, त्यावेळी बाचाबाची झाली आणि शुभम पळून जात असताना सराईत आरोपी अमर साकोरे आणि दोघांनी त्याचा पाठलाग करत लाकडी बांबू, काठी आणि दगड विटांनी मारहाण करत पसार झाले.