Breking News
प्रत्येकाला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात टोळक्याची पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की…उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार पिंक ई – रिक्षांचे वितरणहिंदुत्ववादी संघटनांची चळवळ मोडीत काढण्याचा डाव – भाजपचे प्रवक्ते माधव भंडारीवय वर्षे ७५ अन ट्रेडींग स्टॉकचे आमिष…१२ लाख ७० हजारांची फसवणूकजेलमध्ये कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदतनागपूर महापालिकेच्या बोधचिन्हाचे अनावरण…पुण्यातील नवी पेठेत जेष्ठाला मदतीचा केला बहाणा…अन ATM मधून चोरले 50 हजारकारचालकाच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ ठार…असाही नादीक चोरटा, फक्त चोरायचा महिलांचे अंर्तवस्त्र..

मौजमजा करण्यासाठी चोरत होते दुचाकी, १० दुचाकी जप्त

दोघांना अटक, विमानतळ पोलिसांची कामगिरी

Marathinews24.com

पुणे – मौजमजा करण्यासाठी दुचाकींची चोरी करणार्‍या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ७ लाख रूपये किंमतीच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. मनिषसिंग जितेंद्रसिंग भदोरिया (वय २१ रा. महादेवनगर, संतनगर, लोहगाव) आणि कार्तिक अनिल फुलपगार (वय २१ रा. गुरुद्वारा कॉलनी, स्मशानभुमीजवळ लोहगाव, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोरगावमध्ये २१ एप्रिलला लोकशाही दिनाचे आयोजन – सविस्तर बातमी

वाहनचोरी रोखण्याच्या अनुषंगाने विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तपास पथकातील कर्मचारी दादासाहेब बर्डे आणि ज्ञानदेव आवारी यांना दुचाकी चोरणारे दोघे चोरटे चोरीच्या बुलेटसह संजयपार्कमध्ये असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस अमलदारांनी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांना माहिती कळविली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचुन चोरीची बुलेटसह मनिषसिंग आणि कार्तिकला ताब्यात घेतले.

गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता, दोन्ही चोरट्यांनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ७ दुचाकी, कोथरूडमधून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. उर्वरित दोन दुचाकी कोठून चोरल्या आहेत. त्याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे एपीआय विजय चंदन, पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु कहे, गिरीष नाणेकर, रुपेश तोडेकर यांनी केली.

नागरिकांनी पार्क केलेल्या दुचाकींची चोरी करणार्‍या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून १० दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकारे आणखी काही गुन्हे चोरट्यांनी केले आहेत का, त्यादृष्टीने तपास केला जात आहे. – विजय चंदन, सहायक पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top