Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र

आर्मअ‍ॅक्ट, मोक्का गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळीतील ९ आरोपीविरूद्ध पुणे पोलिसांनी १२ जानेवारीला तब्बल ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आर्मअ‍ॅक्ट, मोक्का गुन्ह्यात टोळीविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यासंदर्भात गुन्ह्याचा तपास करीत पोलिसांनी टोळीविरूद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

जेष्ठाची सायबर चोरट्यांकडून तब्बल २२ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

तक्रारदार हे १७ सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास कोथरूडमधील मुठेश्वर मित्र मंडळ चौकाजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या मयुर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राउत, माँटी व्यास सर्व रा. कोथरूड यांंनी तक्रारदाराला दमदाटी केली. तुम्हाला लय माज आला आहे का? कशाला थांबला आहे येथे, हा आमचा एरिया आहे. रोहित ठोक रे यांना असे म्हणत शिवीगाळ केली. मयुर कुंबरे याने तक्रारदाराला मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलातून गोळी झाडून गंभीर जखमी केले होते. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी निलेश घायवळ, मयुर कुंबरेसह साथीदारांनी गणेश विसर्जनादिवशी ६ सप्टेंबरला कट रचला होता.

कोथरुड भागात आपली दहशत कमी झाली आहे. टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसांत जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो. केस लागली तर बाहेर काढतो. अशी चिथावणी गुंड नीलेश घायवळ याने टोळीला दिली होती. त्यासाठी त्याने संबंधितांना पिस्तूलही दिले होते. त्यापार्श्वभूमीवर टोळीविरूद्ध २५ सप्टेंबरला मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. आरोपींनी वापरलेले पिस्टल, पुंगळी, आरोपी निलेश घायवळ याच्या घरझडतीमध्ये २ जिवंत राऊंड, ४ मोकळया पुंगळया जप्त केल्या होत्या. याप्रकरणात ९ आरोपींना अटक केली असून, ८ पाहिजे आरोपींना न्यायालयाकडून वॉरंट काढून फरार घोषित केले.

फरार आरोपी निलेश घायवळ याला अटक करण्यासाठी इंटरपोल पोलिसांच्यावतीने नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी निलेश घायवळ व सचिन घायवळ यांनी कोथरूडमध्ये दोन बेकायदेशीर इमारती बांधल्या आहेत. त्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. गुन्हयात १२२ साक्षीदार तपासले असून, ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, एपीआय राजेश माळेगावे, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक विशाल चव्हाण, सुनिल राऊत, संतोष डोळस, नितीन काळे, उत्तेकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×