Breking News
Sugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनPune Solapur Road Accident : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यूPune Crime News : सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरीChakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावाSrinagar Dussehra Celebration : श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शन

पुण्यातील ४४ पोलीस ठाणी पर्यावरणपूरक बनवणार- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुण्यातील ४४ पोलीस ठाणी पर्यावरणपूरक बनवणार- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६ चे उदघाटन

marathinews24.com

पुणे – शहरातील एम्प्रेस गार्डनमध्ये यंदाही भव्य पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, पुण्याच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा हिरवागार परिसर असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गसंवर्धन ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. पोलीस विभाग ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल. आज हरित सेनेची गरज आहे, त्यामुळे “खाकीसेना आता हरितसेनेच्या रूपात कार्य करणार” असून शहरातील ४४ पोलीस ठाणे ‘ग्रीन पोलीस स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक पोलीस कर्मचारी सहकार्य करेल, असे मत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.

राज्यातील विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन – सविस्तर बातमी 

एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६ चे उद्घाटन अमितेशकुमार यांनी केले. सुरुवात ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ एका संस्थेची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यात योगदान देणे आवश्यक असून, त्या दिशेने पुणे पोलीस जबाबदारी अत्यंत गांभीर्याने पार पाडेल. याप्रसंगी सुमन सुरेश पिंगळे अनुपमा बर्बे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एम्प्रेस गार्डन हे अनोख्या व कलात्मक सादरीकरणामुळे नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. प्रदर्शनातील प्रमुख आकर्षणांमध्ये जपानी पद्धतीतील इकेबाना पुष्परचना तसेच विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष यांचा समावेश असून, ते प्रेक्षकांना निसर्गाच्या सूक्ष्म सौंदर्याची अनुभूती देत आहेत. प्रदर्शनात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नाशिक तसेच इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी सादर केलेल्या दुर्मिळ व आकर्षक वनस्पतींनी बागकामप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

बागकाम प्रेमींसाठी विशेष गुलाब फुलांची सजावट स्पर्धा, फळ-भाजी स्पर्धा तसेच आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धा, गुलाब पुष्प स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आहे. आयोजकांनी सांगितले की हे पुष्पप्रदर्शन २३ ते २७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×