Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

प्रजासत्ताक दिनी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन

रेल्वे मैदानावर विविध संचलन पथकांची मानवंदना; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

marathinews24.com

बारामती – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती येथील रेल्वे मैदानावर उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

भारतीय प्रजासत्ताक दिन पुण्यात उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी

नावडकर यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना, नागरी संरक्षण दल, रस्ता सुरक्षा पथक, अग्निशमन दल यांचा समावेश होता. सर्व पथकांनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

यावेळी उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, ‘एमआयडीसी’ चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, शहरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

नावडकर यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या पथकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले.

प्रशासकीय भवन येथे ध्वजवंदन

मुख्य कार्यक्रमापूर्वी प्रशासकीय भवन येथे ध्वजवंदन प्रशासकीय भवन येथील प्रांगणात तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे, तहसील कार्यालय तसेच प्रशासकीय भवनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×