Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

ट्रकच्या धडकेत सायलस्वार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

मद्यधुंद ट्रक चालक अटकेत

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रकच्या धडकते सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना स्वारगेट येथील देशभक्त जेधे चौकात घडली. ट्रक चालकाने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली. विश्वनाथ शंकर साळुंखे (वय ६८, रा. जय भवानीनगर, जनता वसाहत, पर्वती पायथा) असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालक दत्तात्रय यादव मोरे (वय ३५, रा. चौखंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली. पोलीस कर्मचारी नेताजी वासुदेव यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बिबवेवाडीत तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकलस्वार विश्वनाथ साळुंखे हे मंगळवारी (२७ जानेवारी) रात्री पावणेदहाच्या सुमारास स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने सायकलस्वार साळुंखे यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. ट्रक चालक मोेरे याला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ट्रक चालक मोरे याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक कोतकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×