Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

बिबवेवाडीत तरुणाचा खुनाचा प्रयत्न

दुचाकीवरुन हल्लेखोर पसार

marathinews24.com

पुणे – बिबवेवाडी परिसरात एका तरुणावर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. भरतसिंह मानसिंह जोधा राठोड (वय ४३, रा. अजिंक्य अपार्टमेंट, सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. बिनमार, जि. जालोर, राजस्थान ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राठोड यांचा भाऊ सोमसिह यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गावठी दारू विक्रेत्याविरुद्ध एमपीडीए कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतसिंह मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास सुखसागनर परिसरातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. भरतसिंह यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×