Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

हवेत गोळीबार करणाऱ्यावर लोणी काळभोर ठाण्यात गुन्हा दाखल

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची बदल्या

शस्त्र परवान्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्रकरण

marathinews24.com

पुणे – मैत्रीणीसोबत झालेल्या वादातून लोणावळ्यात हवेत गोळीबार करणाऱ्या राहूल तारू याच्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध चार गुन्ह्यांची नोंद असतानाही शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटा पत्ता, बनावट भाडेकरार (रेंट अ‍ॅग्रीमेंट) आणि चुकीचे शपथपत्र सादर करून शासन व पोलिसांची दिशाभूल केली. केल्याप्रकरणी भूषण उर्फ राहुल रामचंद्र तारू याच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

प्रीपेड टास्कचे आमिष पडले २० लाखांना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्याने आपण लोणी काळभोर परिसरातील स्वप्नशील सोसायटीमध्ये भाड्याने राहत असल्याचे दाखवले होते. यासाठी त्याने भाडेकरार, शपथपत्र तसेच इतर कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांमध्ये त्याच्यावर कोणताही गुन्हेगारी खटला दाखल नसल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र पोलिस तपासात आरोपी कधीही स्वप्नशील सोसायटीमध्ये वास्तव्यास नसल्याचे उघड झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केलेल्या चौकशीत आरोपीने शस्त्र परवाना मिळवण्याच्या उद्देशाने खोटा भाडेकरार तयार करून जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने शस्त्र परवाना मिळवला होता. विशेष म्हणजे, आरोपी भूषण उर्फ राहुल तारू याच्याविरोधात यापूर्वी पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्यात २०००, २००६ आणि २०११ मध्ये, तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मात्र ही माहिती आरोपीने अर्ज करताना जाणूनबुजून लपवली होती.

पोलिसांनी सांगितले की, शस्त्र परवाना अर्ज करताना अर्जदाराने आपला खरा पत्ता आणि संपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे बंधनकारक असते. मात्र आरोपीने खोटा पत्ता दिला, बनावट कागदपत्रांचा वापर केला आणि आपला गुन्हेगारी इतिहास लपवून शासन व पोलिसांची फसवणूक केली. या प्रकरणी भूषण तारुच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८१, ४२०, ४६५ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा आला प्रकार उजेडात

राहुल तारू हा २२ जानेवारीला त्याच्या मैत्रिणीसोबत लोणावळा येथे गेला होता. मध्यरात्री एकच्या सुमारास मॅप्रो गार्डन परिसरात दोघांचे वादविवाद झाले. त्यातून रागाच्या भरात राहुल तारू याने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत दोन वेळा गोळी झाडली. दरम्यान, गोळीबाराची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. येथील सीसीटीव्ही तपासले असता त्यात हा प्रकार कैद झाल्याचे निदर्शनास आले. लोणावळा पोलिसांनी राहुल तारू याला पौड परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे परवाना असलेले पिस्तूल होते. हे पिस्तूल पुणे पोलिसांकडून देण्यात आल्याचेही समजले. पुणे ग्रामीण पोलिसांनी गोळीबार प्रकरणाचा गुन्हा नोंद केला आहे. त्याने नावात बदल करून हे पिस्तूल घेतल्याचे समोर आले. त्याने हा परवाना मिळवताना भूषण तारू असे नाव सांगितले आहे. वास्तविक पाहता त्याचे नाव राहूल तारू असे आहे. असे पुणे ग्रामिणचे पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी सांगितले.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×