Breking News
Pune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूक

खराडीत वाहनाखाली सापडून बालकाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वाहनाच्या चाकाखाली सापडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर अमर माळवे (वय २) असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी पिकअप वाहन चालक राजू मगन ढोले (वय ६६, रा. बाळकृष्ण अपार्टमेंट, ढोले-पाटील रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम अमर माळवे (वय २५, रा. ढोले पाटील वाडा, खराडी ) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न; टोळक्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम माळवे यांचा दाेन वर्षांचा मुलगा गुरुवारी (२९ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोरील माेकळ्या जागेत खेळत होता. मोकळ्या जागेत ढोले यांचा गोठा आहे. दूध वाहतूक करणारे पिकअप वाहन घेऊन ढोले तेथे आले होते. मोकळ्या जागेत खेळणारा मयूर वाहनाच्या चाकाखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पिकअप वाहनचालक ढोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.

पादचारी तरुणाचा मृत्यू

रस्त्यावर टँकरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटली नाही. याबाबत रमजान इस्माइल शेख (वय ३०, रा. रामोशी आळी, हडपसर गाव) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी राेजी दुपारी पावणेचारच्या सुमारास भरधाव टँकर पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाला होता. हडपसर भाजी मंडईसमोर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला टँकरने धडक दिली. अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी टँकर चालक उद्धव तुकाराम शिंदे (रा. नवनाथ काॅलनी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×