Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

कल्याणीनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

पुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे मोटारीची काच फोडून ऐवजाची चोरीफरार

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कल्याणीनगर भागात ज्येष्ट महिलेच्या गळ्यातील चार लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यानी हिसकावून नेल्याची घटना घडली. आठवडाभरात कल्याणीनगर भागात महिलेचे दागिने हिसकाविण्याची ही दुसरी घटना आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसरमध्ये वस्त्रदालनातून रोकड चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६७ वर्षीय ज्येष्ठ महिला कल्याणीनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शुक्रवारी (३०) सायंकाळी बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास त्या रिक्षाने कल्याणीनगर परिसरात उतरल्या. रिक्षा चालकाला त्या भाडे देत होत्या. तेवढ्यात पाटीमागून आलेल्या चोरट्याने त्यांना धक्का दिला. ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चार लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चाेरट्याचा शोध घेण्यात येत आहे.

आठवड्यापूर्वी कल्याणीनगर भागात पादचारी महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावण्याची घटना घडली. वर्षभरापासून पादचारी महिलांकडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रित कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×