Breking News
Jyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्या

मुख्य सचिवांनी घेतला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा आढावा

नव्या नोंदणी भवनाची केली पाहणी

marathinews24.com

पुणे – राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या प्रशासकीय, तांत्रिक तसेच नागरिक सेवा विषयक विविध बाबींची माहिती त्यांनी घेतली.

जीएस ग्लोबल अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी साधला जागतिक विद्यापीठांशी थेट संवाद – सविस्तर बातमी

या आढावा बैठकीदरम्यान नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, दस्तऐवज नोंदणीची प्रक्रिया, संगणकीकरण, ऑनलाईन सुविधा तसेच तक्रार निवारण यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व कालबद्ध करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा राबविण्याच्या दृष्टीने मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यानंतर मुख्य सचिवांनी नव्या प्रशासकीय इमारतीच्या शेजारी उभारण्यात येत असलेल्या नोंदणी भवनाची पाहणी केली. या इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, उपलब्ध होणाऱ्या सुविधा, कार्यालयीन जागेचे नियोजन, नागरिकांसाठी प्रतिक्षालय, पार्किंग व्यवस्था तसेच आधुनिक पायाभूत सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकामाचे काम नियोजित कालमर्यादेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या आढावा बैठकीस राज्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे, सह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक राजेंद्र मुठे यांच्यासह नोंदणी व मुद्रांक नियंत्रण कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान विभागाच्या कामकाजातील अडचणी, भविष्यातील गरजा तसेच सुधारणा योजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×