Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

माजी सरन्यायाधीश उदय लळीत, अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार

माजी सरन्यायाधीश उदय लळीत, अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार

 सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

maratinews24.com

पुणे – सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारे ‘सूर्यदत्त वनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित करण्यात आले आहेत. येत्या शनिवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजता बंटारा भवन, बाणेर, मुंबई-पुणे महामार्ग येथे हे पुरस्कार सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, जनसंपर्क व्यवस्थापिका स्वप्नाली कोगजे, सल्लागार समिती सदस्य जीवराज चोले उपस्थित होते.

परशुराम वाडेकर यांच्या उपमहापौर निवडीचे स्वागत – सविस्तर बातमी 

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे आदी उपस्थित राहणार आहेत.”

पद्मश्री परमपूज्य आचार्य डॉ. चंदनाजी महाराज (ताई माँ) यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड २०२६’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ यंदा माजी सरन्यायाधीश उदय लळित, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, हास्ययोग चळवळीचे विठ्ठल काटे, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, अभिनेते राकेश बेदी, बांधकाम व्यावसायिक विलासकुमार पालरेषा, दिग्दर्शक सुभाष सेहगल, शिक्षणतज्ज्ञ अशोककुमार ठाकूर, शास्त्रज्ञ डॉ. आनंद भाडळकर, विधिज्ञ ऍड. प्रमोद आडकर, साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया, उद्योजक प्रकाश गांधी, जागतिक रणनीतीकर संजय पुरी यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, योगसद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरी, अभिनेत्री व स्टँडअप कॉमेडियन उपासना सिंग, भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड. आशुतोष श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुरेंद्रा कुमारी, योग प्रशिक्षक राखी गुगळे, अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कनक सहा, बासरीवादक पारस नाथ, ग्लोबल युथ अँबेसेडर दारासिंग खुराणा, डॉ. प्रमोद त्रिपाठी, गिर्यारोहक आशिष माने यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’, तर सीए मोहित धांड, गायिका प्रीती दवे व पिंकी दवे, जलतरणपटू हातवी शहा यांना ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’, तर मास्टर ऋषी शिव प्रसन्न आणि मास्टर राघव मालपाणी यांना ‘सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड’ देण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×