पोलिसांकडून डॉक्टर सुश्रुत घैसास हजर होण्याची नोटीस
Marathinews24.com
पुणे – गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाच्या पुणे पोलिसांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर त्यांच्या जबाबाची नोंद घेण्यात येणार आहे. याप्रकरणात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने डॉक्टर घैसास यांची भूमिका संशयास्पद असल्याचा अहवाल दिला होता. पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, संबंधित डॉक्टरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
पुण्यात शरद पवार,अजित पवार यांच्यात बैठक नेमकं काय घडलं – सविस्तर बातमी
गर्भवती महिलेवर वेळेत उपचार न केल्याप्रकरणी डॉ. सुशृत घैसास यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार ससूनच्या अहवालानुसार डॉ. घैसास यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ नुसार १०६ (१)अन्वये अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोनाली उर्फ ईश्वरी सुशांत भिसे (वय ३७, रा.) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडली होती.
गर्भवती मोनाली उर्फ ईश्वरी यांना कुटूंबियाने २१ मार्चला विमानगरमधील इंदिरा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २८ मार्चला ईश्वरीच्या पोटात दुखू लागले. त्यानुसार डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, मुदतपुर्व बाळंतपण करावे लागणार असल्याचा सल्ला कुटूंबियांना दिला. त्यानुसार तिला खराडीतील मदरहुड रूग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, ईश्वरीवर काही महिन्यांपुर्वी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉ. सुशृत घैसास यांनी उपचार केले होते. त्याअनुषंगाने कुटूंबियाने तिला मंगेशकर रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉ. घैसास यांनी ईश्वरीची तपासणी केली असता, तिचा बीपी वाढला होता. मुदतपुर्व प्रसुतीनंतर बाळांना आयसीयूमध्ये ठेवावे लागणार होते. त्यासाठी प्रत्येकी बाळाला १० लाख रूपये असे २० लाख रूपये जमा करण्याचे डॉ. घैसास यांनी सांगितले. आम्ही पैशांचे पाहतो, तुम्ही उपचार सुरू करा असे कुटूंबियांनी डॉक्टरांना सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तुमच्याकडून होत नसल्यास ससूनमध्ये जा, तिकडे उपचार चांगले होतात असे सांगितले होते.