Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

नगर रस्त्यावर तरुणाला लुटणारे चोरटे अटकेत

मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकास अटक

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तरुणाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वडगाव शेरी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. मोहम्मद अली युसुफअली जाफरी (वय २७), अक्रम अबालू इराणी (वय २५, दाेघे रा. विष्णुकृपानगर, शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २८ वर्षीय तरुण विश्रांतवाडीतील मुंजाबा वस्ती परिसरात राहायला आहे. तो ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नगर रस्त्याने निघाला होता. वडगाव शेरीतील लष्कराच्या अग्निबाज डिव्हिजनच्या परिसरात तो थांबला. त्या वेळी आरोपी जाफरी आणि इराणी तेथे आले. येथे लघुशंका करण्यास मनाई असल्याचे सांगून त्याला धमकावले. त्याच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी हिसकावून दोघे जण पसार झाले. घाबरलेल्या तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.

महिलेची छेड काढणारा रिक्षा चालक अटकेत

महिलेची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. ख्वाजा नुरुद्दीन टिनमेकर (वय ५४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय महिला येरवड्याील लक्ष्मीनगर परिसरातून निघाली होती. त्या वेळी रिक्षाचालक ख्वाजाने महिलेला अडवून तिची छेड काढली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तो पसार झाला. महिलेने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस कर्मचारी जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×