Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरासमोर खेळणाऱ्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या एकाविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रशांत काळे (वय ३०, रा. राजमाता काॅलनी, कात्रज-कोंढवा रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कात्रज बाह्यवळण मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी

तक्रारदाराची ११ वर्षांची मुलगी घरासमोर ४ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास खेळत होती. त्या वेळी आरोपी तेथे आला. त्याने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तू मला आवडते, असे तो तिला म्हणाला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक महाडिक तपास करत आहेत.

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्या एकाविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ईश्वर अंकुश आवटे (वय ३५, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) याच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आणि आरोपीची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपीने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याच्याकडे वेळोवेळी विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बैरागी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×