Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कात्रज बाह्यवळण मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आजम अब्दुलरौफ खान (वय ३८, रा. श्रीकृष्ण बिल्डिंगर, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार झाला आहे. याबाबत खान यांचा भाऊ मजहर (वय ४४) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फििर्याद दिली आहे.

वानवडीत भरधाव कार नाल्‍यात पलटी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आजम हे गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गाने निघाले होते. हांडेवाडी परिसरात भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रक चालक पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

ट्रकच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

पुणे – एम्प्रेस गार्डन परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हरजिंदरसिंग अमरसिंग मक्कर (वय ७०, रा. सिटाडेल सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालक आनंद सदोबा गोफणे (वय ३२, रा. इठगा, कलबुर्गी, कर्नाटक) याला अटक करण्यात आली. याबाबत मक्कर यांचा मुलगा तगेंदरजितसिंग (वय ३९) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिजिंदरसिंग मक्कर हे गुरुवारी (५ फेब्रुवारी) सकाळी पाचच्या सुमारास फिरायला बाहेर पडले होते. एम्प्रेस गार्डन परिसरात दुचाकीस्वार मक्कर यांना ट्रकने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मक्कर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक ओैचरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×