Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वानवडीत भरधाव कार नाल्‍यात पलटी

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

चालकाला किरकोळ दुखापत

‘marathinews24.com

पुणे – भरधाव वेगात असलेल्‍या कार चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने नाल्‍यात कोसळून एकजण जखमी झाला आहे. ही घटना गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्‍या सुमारास वानवडी येथील नाल्‍यात घडला. गंगा सॅटेलाइट सोसायटी व सॅटेलाइट बायोडायव्हर्सिटी पार्कसमोर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात घडला. पांढऱ्या रंगाच्‍या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. अपघातानंतर परिसरातील नागरिक व वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत करत कार चालकाला बाहेर काढले.

अल्पवयीन मुलांकडून मेफेड्रोन जप्त – सविस्तर बातमी 

सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु, या अपघातात चालकाला किरकोळ मार लागला. कारचा ताबा नेमका कशामुळे सुटला, रस्त्याची अवस्था की यांत्रिक बिघाड होता हे समजु शकले नाही. चालकाची कोणतीही तक्रार नसल्‍याने याबाबत कोणताही गुन्‍हा दाखल करण्यात आला नसल्‍याचे पोलिसांनी सांगितले. सॅटेलाइट बायोडायव्हर्सिटी पार्कसमोरील हा रस्ता वर्दळीचा आहे. यावेळी कारच्‍या मध्ये कोणी न आल्‍याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×