Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

अल्पवयीन मुलांकडून मेफेड्रोन जप्त

अल्पवयीन मुलांकडून मेफेड्रोन जप्त

कॅम्प परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील एमजी रोड कॅम्प परिसरात शाळेसमोर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 13 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. दोघांनी मेफेड्रोन नशा करण्यासाठी ड्रग्ज स्वतःजवळ बाळगले असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार विशाल दळवी यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उसतोडणीला नकार दिला, बांबूसह वायरने केली मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक मंगळवारी (दि.3) रात्री पावने आठ वाजताच्या सुमारास गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला उभे असलेले दोन संशयित तरुण कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसून आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली. चौकशीत दोघांचे वय 18 वर्षांखालील असल्याचे निष्पन्न झाले.

तपासणीदरम्यान त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. फील्ड टेस्ट किटद्वारे तपासणी केली असता ते मेफेड्रोन (एमडी) असल्याचे स्पष्ट झाले. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने वजन केल्यावर त्याचे एकूण वजन सुमारे १३ ग्रॅम असल्याचे आढळले. पुढील तपासासाठी हा नमुना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवीयन मुलांना हा अंमली पदार्थ कोणी पुरवला, याचा पोलीस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×