Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

उसतोडणीला नकार दिला, बांबूसह वायरने केली मारहाण

Pune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटना

मजूरीचे प्रलोभन दाखवून नेले गावी

marathinews24.com

पुणे – शेतात काम असल्याचे सांगत एक हजार रुपये रोजची मजूरी मिळेल असे प्रलोभन दाखवून तरुणांना माढा तालुक्यातील गावात नेऊन त्यांच्याकडून पहाटेपासून रात्री १० वाजेपर्यंत ऊसतोडणी करुन घेण्यात आली. कामाला नकार दिला तर केबलच्या वायरने व बांबुने मारहाण केली. त्यांच्यातून पळून आलेल्या तरुणाने बंडगार्डन पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरुन हा सर्व प्रकार समोर आला आहे. अमित अशोक दळवी (वय ३३, रा. एविंग स्काय वॉटर सोसायटी, वाघोली) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकी चालकाने धडक दिली, चाकाखाली सापडून जेष्ठ महिला ठार – सविस्तर बातमी 

अप्पा तांबे, अक्षय तांबे, शुभम (रा. मु पो नाडी, ता. म्हाडा, जि. सोलापूर) यांच्यावर अपहरण व दुखापत आणि बेकायदेशीर सक्तीची मजुरी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील नाडी येथे २४ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. २३ डिसेंबर रोजी रात्री त्यांनी उशिरा अरोरा टॉवर येथे डिलिव्हरी दिली. त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरबाहेर ते झोपले होते. २४ डिसेंबर रोजी सकाळी उठले तेव्हा त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. ते दिवसभर स्टेशन परिसरात फिरत होते. रात्री एकाने अमित दळवी यांना काम पाहिजे का असे विचारले. त्यांनी होकार दिल्यावर पुण्याजवळ शेतात काम आहे. एक हजार रुपये रोजची मजुरी असे सांगितले. त्यानंतर त्यांना रात्री ११ वाजता पुणे स्टेशन येथून आणखी दोन तीन जणांना घेऊन एका कारमध्ये बसविले.

पहाटे ३ वाजता सोलापूर जिल्ह्यात एका ठिकाणी सोडले. तेथून मालवाहू गाडीतून त्यांना म्हाडा येथील अप्पा तांबे यांच्या घराजवळील एका खोलीत ठेवण्यात आले. त्यांच्याकडून ऊस तोडणीचे काम करुन घेण्यात आले. ऊसतोडणीचे काम अत्यंत कष्टाचे असल्याने अमित दळवी यांच्याकडून ते काम होत नव्हते. अप्पा तांबे हे त्यांना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कामासाठी उठवत होते. रात्री १० वाजेपर्यंत ऊस तोडणीचे काम त्यांच्या इच्छेविरुद्ध करुन घेत होते. काम करण्यास नकार दिला असता अप्पा तांबे, अक्षय तांबे व शुभम नावाची व्यक्ती त्यांना केबलच्या वायरने व बांबुने माहरण करुन जबरदस्तीने काम करण्यास लावत होते.

काम झाल्यावर खोलीत कोंडुन ठेवत होते. तसेच कामाचा मोबदला म्हणून एक रुपया दिला नाही. म्हणून २९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता तो नजर चुकवून शेतातून चालत मुख्य रस्त्यावर आला. तेथून कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवर आला. एकाच्या मोबाईलवरुन वडिलांशी संपर्क साधला. रेल्वेने पुणे स्टेशनला आला. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता त्याने फिर्याद दिली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरील एजंट हा अनोळखी आहे. त्याच्याबरोबर आणखी काही तरुणांकडून ऊसतोडणी करुन घेऊन त्यांना डांबुन ठेवले जात असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×