बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील घटना
Marathinews24.com
पुणे – रिलायन्स जिओ कंपनीची १२ लाख ४४ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना जानेवारी ते डिसेंबर २०२२ कालावधीत बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील ममता चौकात घडली आहे. संबंधित कामाचे लेखे तपासले असता, चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यानुसार उपठेकेदार महिलेने याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या तरूणाला लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फायबर इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी रिलायन्स जिओ कंपनीकडून काम केले जाते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ कालावधीत बालेवाडीतील ममता चौकात काम सुरू होते. त्यावेळेस चोरट्यांनी कंपनीचे तब्बल १२ लाख ४४ लाखांचे साहित्य चोरून नेले. कामादरम्यान याची माहिती सुरक्षारक्षकांसह कोणालाही मिळाली नाही. मात्र, संबंधित प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर लेखे परिक्षणादरम्यान साहित्य नसल्याचे दिसून आले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर उप ठेकेदार महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक रहिगुडे तपास करीत आहेत.