पुण्यात १५ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला; स्वतःच कापली नाळ

आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरातच मुलाला जन्म देऊन स्वतःच बाळाची नाळ कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सध्या संबंधित मुलगी व तिच्या नवजात बाळावर रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली स्फोटचे पुणे कनेक्शनचा कॉल; तपासात सत्य वेगळेच – सविस्तर बातमी

आदिल फारुख शेख (वय २४, रा. गोल्डन सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या मोठ्या बहिणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ३१ जानेवारीला सकाळी साडे अकराच्या सुमारास माहेरी आईकडे आल्या होत्या. मात्र, त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. थोड्या वेळाने त्यांचा भाऊ आल्यानंतर आवाज दिल्यावर लहान बहिणीने दरवाजा उघडला. घरात प्रवेश करताच घरातील दरवाजाजवळ रक्ताचे डाग पडलेले दिसून आले. खिडकीजवळ एक नवजात बाळ ठेवलेले दिसल्याने तक्रारदार महिलेला धक्का बसला. लहान बहिणीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने घरातच डिलिव्हरी झाल्याचे सांगितले.

बाळाची नाळ कोणी कापली, असे विचारल्यावर तिनेच स्वतः नाळ कापल्याची कबुली दिली. यानंतर आई आणि आत्या घरी आल्यानंतर मुलीने एक वर्षापासून आदिल शेख याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. या काळात दोन ते तीन वेळा शरीरसंबंध झाल्याचेही तिने नमूद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ मुलीला आणि बाळाला रुग्णालयात दाखल केले. दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक निकिता उईके करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×