Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

‘हिंद दी चादर’ शहिदी समागमासाठी प्रशासन सज्ज

वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन

marathinews24.com

नवी मुंबई –  ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, सेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पार्किंग आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली.

‘दगडूशेठ’ ट्रस्टतर्फे कौशल्य प्रशिक्षणातून महिला आत्मनिर्भर – सविस्तर बातमी

या बैठकीस पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, सह आयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो तथा नवी मुंबई समागम समन्वयक रविंद्र राठोड, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अंशुमन श्रीवास्तव व रविंद्र इंगोले, प्र. माहिती उपसंचालक मनोज सानप, जेएनपीएचे वाहतूक अधिकारी यशवंत पाटील व नागेश आकोडे, तसेच तहसिलदार (सामान्य प्रशासन) गजानन धुमाळ आदी उपस्थित होते.

नागपूर व नांदेड येथे शिस्तबद्ध व शांततेत पार पडलेल्या या समागमानंतर खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या.

नाशिक, पुणे व मुंबईकडून जेएनपीएकडे जाणाऱ्या तसेच जेएनपीएकडून विविध ठिकाणी जाणाऱ्या कंटेनर वाहतुकीचे विशेष नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र मार्गिका निश्चित करणे, पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक रेल्वेने येण्याची शक्यता लक्षात घेता, दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक ठेवू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×