Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

‘दगडूशेठ’ ट्रस्टतर्फे कौशल्य प्रशिक्षणातून महिला आत्मनिर्भर

कौशल्याधारित कोर्सेस पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप

marathinews24.com

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत मेकांती फॅशन यांच्या सहकार्याने आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंग व ड्रेस डिझाइन या कौशल्याधारित कोर्सेस पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्यांना चालना देणे आणि गरजू महिलांना त्यांच्या कलेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली शरद पवार यांची  भेट – सविस्तर बातमी

कार्यक्रमाचे आयोजन शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, संस्कार वर्ग प्रमुख विजय भालेराव, मंगेश सूर्यवंशी, मेकांती फॅशन डिझाईनच्या संचालिका अंजली पवार, नेहा गुरव आदी उपस्थित होते. यावेळी प्रशस्तीपत्र देवून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

महेश सूर्यवंशी म्हणाले, भारतात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, येत्या काळात रोजगाराच्या संधी निश्चितच निर्माण होणार आहेत. मात्र, केवळ शालेय शिक्षण महत्त्वाचे नसून, त्यासोबत विविध कौशल्ये आत्मसात करणेही तितकेच आवश्यक आहे. आपण ‘विश्वगुरू’ होऊ शकतो; परंतु त्यासाठी आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेणे गरजेचे आहे. जेव्हा आपण संपूर्ण ताकदीनिशी पुढे उतरू, तेव्हा भारत नक्कीच विश्वगुरू बनेल, असेही त्यांनी सांगितले.

विजय भालेराव म्हणाले, शालेय जीवनात केवळ गुणांची स्पर्धा दिसून येते. मात्र फक्त गुण मिळवून उपयोग नाही; स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. कौशल्यांच्या जोरावरच बाहेरील स्पर्धेत टिकून राहता येते. तसेच आपल्या कौशल्यांच्या बळावर स्वत:चा नवा व्यवसाय उभा करणेही शक्य आहे.

अंजली पवार म्हणाल्या, महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच सुरू असलेल्या व्यवसायांना अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य ट्रस्टच्यावतीने केले जाते. अशा उपक्रमाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वत:चे करिअर उभारण्याची संधी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×