Breking News
रुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – भानुप्रताप बर्गे यांचे मतउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळमहाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलनअनैतिक संबंधाला विरोध केल्याने मनोरूग्ण महिलेचा खूनवाहनाच्या धडकेत तरूण ठार, खराडीतील घटनातरुणाला शेअरमधील गुंतवणूक पडली १४ लाखांना

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली शरद पवार यांची  भेट

शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करताना रामदास आठवले यांनी एनडीएत सहभागी होण्याचे केले आवाहन

marathinews24.com

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रुग्णालयात भेट घेवून तयांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पुणे पासपोर्ट कार्यालयाने घेतला महत्वपूर्ण निर्णय – सविस्तर बातमी

शरद पवार यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व तपासण्या करून त्यांना पाच दिवस उपचार करण्यासाठी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आज रामदास आठवले यांनी रुग्णालयात शरद पवारांची भेट घेतली.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे  पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, सरचिटणीस  श्याम सदाफुले, नगरसेवक नीलेश आल्हाट, मोहन जगताप, जयदेव रंधवे, संघमित्रा गायकवाड, सोनूभाऊ निकाळजे, संतोष खरात, सनी अवसरमल, बुद्धीशा रंधवे, संग्राम खंगाळ, संजय बनसोडे, विक्की वाळके आदि मान्यवर उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पवार साहेबांची प्रकृती सध्या चांगली आहे. हॉस्पिटल मध्ये असून देखील त्यांनी लोकसभा चालू आहे का? विचारलं त्यावर मी त्यांना लोकसभा चालू नाही मात्र राज्यसभा चालू असल्याचे सांगितले. पवार साहेबांची विल पावर खूप चांगली आहे. त्यामुळे लवकच बरं वाटेल.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट महायुतीमध्ये अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी आहे. सध्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी मध्ये समाविष्ट व्हावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. असे झाल्यास आम्हाला आनंदच होईल. शरद पवार गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट झाल्यास सुप्रिया सुळे यांच्या मंत्रीपदासकट सर्व अटींवर सकारात्मक प्रतिक्रिया उमटतील, अशी ग्वाही देखील आठवले यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×