Breking News
कारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनफुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्लापंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे पासपोर्ट कार्यालयाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणानंतर आली जाग

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर त्याला पासपोर्ट कसा मिळाला, या प्रश्नावरून पासपोर्ट यंत्रणेवर टीका झाली होती. त्यापार्श्वभूमीवर पुणे पासपोर्ट कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, संशयास्पद पत्त्यांच्या प्रकरणात पुन्हा सखोल पडताळणी करण्याचे पोलिसांना सूचना देण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दिली.

ट्रीपलसीट भोवली; पुण्यात दिवसभरात १७३० दुचाकी जप्त – सविस्तर बातमी

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे संघाचे सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवीन पासपोर्ट काढणे तसेच नूतनीकरणासाठी चार दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन डॉ. विनोद गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी उप पासपोर्ट अधिकारी सृष्टी पांडे, संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे, आशिष देशमुख, दत्तात्रेय अढागळे तसेच पासपोर्ट कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी जतीन पोटे उपस्थित होते.

शिबिरात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे पासपोर्ट प्रक्रिया चार दिवसांत केली जाणार आहे. शिबिराच्या निमित्ताने डॉ. गायकवाड यांच्याशी संवादाचे आयोजन केले होते. त्यांनी राजदूत म्हणून रशिया, कुवेत आणि फ्रान्समध्ये काम करताना आलेले अनुभव, बदलती शासकीय धोरणे तसेच परदेशात भारतीयांची प्रतिमा याबाबत माहिती दिली. प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित पत्रकारांनी विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. गुंड निलेश घायवळ प्रकरणानंतर ज्या ठिकाणी कोणी वास्तव्यास नसल्याचा शेरा पोलिसांकडून देण्यात आला आहे, अशा पत्त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

बनावट कागदपत्रे, खोटा पत्ता किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आगामी काळात ई-पासपोर्टचे प्रमाण वाढणार असून, सन 2035 पर्यंत सर्व पासपोर्ट हे ई पासपोर्ट मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा बदल लवकरच प्रत्यक्षात दिसून येईल, असेही त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×