Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

ट्रीपलसीट भोवली; पुण्यात दिवसभरात १७३० दुचाकी जप्त

५ हजारांवर बेशिस्त चालकांची शाळा घेतली जाणार

marathinews24.com

पुणे – बेशिस्तपणे दुचाकी चालविणार्‍यांविरूद्ध वाहतूक पोलिसांनी मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.१०) एकाच दिवसात ट्रीपलसीट दुचाकी प्रवास करणार्‍यांच्या तब्बल १ हजार ६९० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. संबंधित दुचाकी पोलीस ठाण्यांसह वाहतूक विभागात पार्क केल्या आहेत. ट्रीपलसीट प्रवास करणार्‍या ५ हजारांवर बेशिस्तांची शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात बुधवारी (दि.११) शाळा भरवली जाणार आहे. त्यांना दिवसभर वाहतूक नियमांची जनजागृती केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

कर्ज फेडण्यासाठी चुलत भावाच्या घरी केली चोरी – सविस्तर बातमी

दुचाकीवर ट्रीपलसीट प्रवास करीत अनेकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले होते. त्यापार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने मंगळवारी शहरातील विविध भागात नाकाबंदी करून ट्रीपलसीट दुचाकीस्वारांना अडवले. त्यांचे वाहन ताब्यात घेत जवळच्या पोलीस ठाण्यांसह वाहतूक विभागात ठेवण्यात आले आहे. कारवाईदरम्यान बहुतांश तरूण असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठी अनेकांनी आपल्या नातलगांसह जवळचे मित्र, पोलीस, राजकीय पदाधिकार्‍यांना फोनाफोनी केली. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. संबंधितांची दुचाकी जप्त करीत त्यांना थेट पोलीस मुख्यालयात बोलवले आहे. वाहनांची कागदपत्रे जोपर्यंत पुर्तता केली जाणार नाही, तोपर्यंत वाहने मूळ मालकांना परत दिली जाणार नाहीत.

बेशिस्तांमध्ये सर्वाधिक तरूण ट्रीपलसीट

बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नियमांचे उल्लंघन करीत दुचाकी दामटली जात असल्याचे दिसून आले आहे. ट्रीपलसीट प्रवास, विरूद्ध दिशेने वाहने चालविणे, मॉडीफाईड वाहनांद्वारे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे अशा बेशिस्तांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बेशिस्त दुचाकीस्वारांना लगाम घालण्यासाठी चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. ट्रीपल सीट दुचाकीस्वारांना बाजूला घेत, त्यांचे वाहन जप्त करण्यात आली. महत्वाचे चौक, वर्दळीची ठिकाणे, शाळा- महाविद्यालय परिसरात नाकाबंदीतून नियमभंग करणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. ही मोहिम सातत्याने राबवली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

मॉडीफाईड वाहने बनवणारे दुकानदार रडारवर

दुचाकीसह मोटारींमध्ये बदल घडवून कर्णकर्कश हॉर्न बसवणे, सायलेन्सरमध्ये फटाक्यासारखे आवाज बटण बसवणे, मोठमोठे हॉर्न बसवणार्‍या दुकानदारांविरूद्धही कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार संबंधिताचे दुकान सील करण्यात येत आहेत. वारजे माळवाडी परिसरात तब्बल सहा दुकानांविरूद्ध कारवाई केली आहे. तसेच स्वारगेट परिसरातील वेगा सेंटरनजीक असलेल्या दुकानदारांविरूद्धही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पालकांनो मुलांचे लाड बंद करा

पालकांकडून मुलांचे लाड पुरवण्यासाठी दुचाकी हाती दिली जाते. प्रत्यक्षात मात्र, मुलांकडून वाहतूकीचे नियमभंग करीत वाहने दामटली जात आहेत. त्यामुळे पोलिसांकडून थेट वाहन जप्तीची मोहिम हाती घेतली आहे. ट्रीपलसीट प्रवास करणार्‍यांनो सावधान, तुम्ही जर कारवाईच्या जाळ्यात अडकल्यास अनेक दिवस वाहन माघारी मिळणार नाही. जर वाहन माघारी हवे असल्यास, वयाचा पुरावा, इन्सुरन्स, आरटीओ पासिंग, आरटीओकडील एनओसी, पालकांचा कबुलीनामा कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे.

शहरात बेशिस्त वाहतूकीद्वारे नागरिकांना वेठीस धरणार्‍यांना धडा शिकवला जाणार आहे. दुचाकी ट्रीपलसीट प्रवास करणारे, मॉडीफाईड दुचाकी, बेशिस्त चालकांविरूद्ध वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाईची मोहिम राबवली जात आहे. त्यानुसार एकाच दिवसांत ५ हजारांवर बेशिस्तांना धडा शिकवला आहे. त्यांचे एकदिवसाचे समुपदेशन केले जाणार आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×