Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

कर्ज फेडण्यासाठी चुलत भावाच्या घरी केली चोरी

चोरट्याला मुंढवा पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – कर्ज फेडण्यासाठी चुलतभावाच्या घरी चोरणाऱ्या तरुणाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदी असा २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आशुतोष अशोक कासवा (वय ३८, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरकोळ वादातून बांधकाम मजुराच्या खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

तक्रारदाराच्या सदनिकेतून ५ फेब्रुवारी रोजी साेन्याचे दागिने, एक किलो चांदी, तसेच दोन लाख रुपयांची रोकड असा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पाेलिसांनी आरोपी आशुतोष याला ताब्यात घेतले. चैाकशीत त्याने चुलतभावाच्या घरी चोरी केल्याची माहिती दिली. कर्ज फेडण्यासाठी त्याने चुलतभावाच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली.पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, राजू कदम, शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×