Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

किरकोळ वादातून बांधकाम मजुराच्या खुनाचा प्रयत्न

विश्रांतवाडी पोलिसांकडून दोघांना अटक

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून दोघांनी बांधकाम मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. बांधकाम मजुराच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मनीष अशोक साहू (वय १९) आणि मणीशंकर अशोक साहू (वय २१, दोघे रा. प्रतीकनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली. नंदकुमार जगेश्वर नेताम (वय ३७, रा. उत्तम टाऊन स्केप, प्रतीकनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्योच नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

वादातून तरूणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदकुमार नेताम आणि आरोपी साहू हे मुळचे छत्तीसगडमधील बमुरहड्डी गावातील रहिवासी आहेत. तिघे जण बांधकाम मजूर आहेत. ८ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नेताम आणि त्याची पत्नी नियोजित गृहप्रकल्पातील लेबर कॅम्पकडे निघाले होते. त्या वेळी आरोपी साहू तेथे थांबलेले होते. ‘बिगारी कामगार नीट काम करत नाहीत’, असा टोमणा आरोपी साहू यांनी त्याला मारला. त्यानंतर नेताम याचा आरोपींशी वाद झाला. वादावादीतून त्यांच्यात हाणामारी झाली. आरोपी मनीष साहू तीक्ष्ण शस्त्र घेऊन तेथे आला. आरोपींनी नेताम याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. नेताम याच्या पत्नीने मध्यस्थी केली. तेव्हा आरोपींनी तिला धक्काबुक्की केली. नेताम याला वाचविण्यासाठी पत्नीने आरडाओरडा केला. नेताम याच्या मेहुण्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×