Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

वादातून तरूणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

गंजपेठ लोहियानगरात घडली होती घटना

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून तरूणाला लोखंडी पट्टयाने मारहाण करणार्‍या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ८ फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास गंजपेठ लोहियानगरात घडली होती. अदनान उर्फ बुढा शेख (वय २४, रा. लोहियानगर) आणि सोहेल आमिर खान (वय २९ रा. जयजवान मित्र मंडळाजवळ, लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोईज इस्माईल शेख वय २८ रा. लोहियानगर याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

महिलेचे गंठण हिसकावणार्‍या दुचाकीस्वार चोरट्यांना अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोईज आणि त्याचे मित्र ८ फेबु्रवारीला रात्रीच्या सुमारास गंजपेठेत थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या अदनान आणि सोहेलने जुन्या वादातून मोईजला शिवीगाळ करीत मारहाण केली. आरोपी अदनानने लोखंडी पट्टयाने मोईजला मारहाण करीत जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. दरम्यान, जखमी मोईजला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भारत बोराडे तपास करीत आहेत.

काशेवाडीत वादातून तरूणावर वार

जुन्या वादातून तरूणावर वार केल्याची घटना ८ फेबु्रवारीला रात्री सव्वा दहाच्या सुमारास काशेवाडीतील त्रिकोणी गार्डन परिसरात घडली आहे. याप्रकरणी अविनाश सुहास गायकवाड वय १८, रा. काशेवाडी याच्याविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहन योगेश जाधव वय २० रा. भवानी पेठ, काशेवाडी याने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलीस अमलदार कुंभार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×