Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

महिलेचे गंठण हिसकावणार्‍या दुचाकीस्वार चोरट्यांना अटक

विमानतळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पतीसोबत पायी चालत व्यायाम करणार्‍या महिलेच्या गळ्यातील २ लाख ५० हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावणार्‍या दोघा दुचाकीस्वार चोरट्यांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ९ फेबु्रवारीला संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास खराडीतील जनक बाबा दर्गा चौकात घडली आहे. पंकज गणेश दिवटे वय २० रा. काकड हिरा, बीड आणि गणेश भारत गिर्‍हे वय २२ रा. नगररोड बीड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ५८ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दागिने चोरी प्रकरणी महिला गजाआड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला आणि त्यांचे पती ९ फेबु्रवारीला संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास खराडीतील जनक बाबा दर्गा चौकात पायी चालत व्यायाम करीत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेजवळ येउन त्यांच्या गळ्यातील अडीच लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. दाम्पत्याने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दुचाकी क्रमांकाच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×