Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

घरफोडीत ३० लाखांचा ऐवज लांबविला

व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीला

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. मध्य भागातील सोमवार पेठेतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी २८ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली, तसेच मार्केटयार्ड भागात सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ६३ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आल.

ज्येष्ठ नागारिकाला धमकावून लुटले – सविस्तर बातमी 

सोमवार पेठेतील आगरकर शाळेजवळ असलेल्या एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा २८ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आणि कुटुंबीय हे सोमवार पेठेतील पन्ना सोसायटीत राहायला आहेत. ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातून २८ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.

मार्केट यार्ड भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे रुणवाल पार्क सोसायटीतील सदनिकेत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक गडगडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×