Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यात थेट सोसायटीतच थाटले हुक्का पार्लर

सहकारनगर पोलिसांची कारवाई, पाचजण ताब्यात

marathinews24.com

पुणे – उच्चभ्रु सोसायटीत थाटलेल्या हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी कारवाई करीत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. हुक्का पॉट व साहित्य, तसेच विविध प्रकारच्या हुक्का फ्लेवर्सनी भरलेले चिलीम असा १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धनकवडी येथील श्री गुरूनानक कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली आहे.

कर्ज फेडण्यासाठी चुलत भावाच्या घरी केली चोरी – सविस्तर बातमी

राजनसिंग भजनसिंग गोरोवाडा (वय.३५,रा. राजमुद्रा सोसायटी धनकवडी), पारस परमानंद शर्मा (वय २४ ), सुभाष मानसिंग गिरी (वय २० ), तिलक भोला तिवारी (वय ३५ ), नारायण मेघे आचार्य (वय ३४, सर्व रा. मुळ नेपाळ, सद्या गुरूनानक कृपा बिल्डिंग, राजमुद्रा सोसायटी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी, आरोपींविरुद्ध सहगारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजसिंग याच्या मालकीची धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीत गुरूनानक कृपा नावाची बिल्डिंग आहे. तेथे तो मुलांचे खासगी वसतीगृह चालवितो. (पिजी) त्याच इमारतीच्या टेरेसवर त्याने हे हुक्का पार्लर थाटले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहकारनगर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस हवालदार अमोल पवार यांना राजमुद्रा सोसायटीतील मेहेर लिव्हिंग बिल्डिंग शेजारील श्री गुरूनानक कृपा बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्याच्या टेरीसवर अवैध हुक्का पार्रल सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त मिलींद मोहीते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कर्चे कर्मचारी निलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, महेश भगत, अमोल पवार यांच्या पथकाने बिल्डिंगमध्ये छापा टाकला.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चार टेबलवर आठ व्यक्ती हुक्का सेवन करताना दिसून आले. काऊंटरवर असलेल्या व्यक्तीकड चौकशी केली असता,त्याने सर्व माहिती पोलिसांना दिल. हुक्का पार्लर चालविणारा मालक आणि कामगार अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच हुक्क्याचे साहित्य देखील जप्त केले.

शहरात हुक्का पार्लवर पोलिसांनी यापुर्वी देखील मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे हुक्का पार्लरवाल्यांनी शहरातून काढता पाय घेतला आहे. परंतू काही लोकांनी नामी शक्कल लढवित चक्क सोसायटीच्या छतावर, तसेच सदनिकांमध्ये हुक्का पार्लर थाटल्याचे निदर्शनास आले आहे. यापुर्वी विमानतळ पोलिसांनी देखील एक सदनिकेत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई केली होती.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×