येरवडा पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – कपड्यांच्या दुकानातून महिलांच्या अंडरगारमेंटची चोरी करणार्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी सव्वा सात लाख किंमतीचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट जप्त केले आहेत.गणपत मांगीलाल डांगी (वय ४४ रा.विठ्ठलनगर, सिंहगड रोड ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुरेंद्रकुमार राजेंद्रप्रसाद शर्मा (वय ३४, रा. मांजरी बुद्रूक, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुरेंद्रकुमार यांचे कल्याणीनगर परिसरात एस.एल. इंटरप्रायजेस नावाचे कपडे विक्रीचे दुकान आहे. आरोपी डांगी हा वितरकाकडून ऑर्डर घेण्याच्या बहाण्याने दुकानात वेळोवेळी येत होता. जून २०२४ ते एप्रिल २०२५ कालावधीत त्याने दुकानात महिलांचे अंडर गारमेंट, टी-शर्ट, नाईट पॅन्ट, पुरूषांचे कपडे चोरले. जवळपास ८ लाखांची कपडे त्याने चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, तुषार खराडे, सागर जगदाळे, भीमराव कांबळे, प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल यांनी तपासाला गती दिली होती. आरोपी कल्याणीनगर परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून पळून जाणार्या गणपत डांगी याला ताब्यात घेतले, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी गणपत डांगी याने कपड्याच्या दुकानातून वेळोवेळी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली.ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक विजय ठाकर, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, संदिप जायभाय, सुधीर सांगडे यांनी केली आहे.