दुकानदारासह चौघांना ४ दिवसांची पोलिस कोठडी
marathinews24.com
पुणे– ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी सराफाने आरोपींना चक्क २ लाखांची सुपारी दिली असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींनी गुन्ह्याचा बनाव करताना चोरी करताना जे २२ लाखांचे सोने लुटन नेले तेही बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अटक केलेल्या चौघांनाही न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कुख्यात गुंड टिप्या पठाणसह टोळीवर मोक्काची कारवाई – सविस्तर बातमी
धायरीमधील श्री ज्वेलर्सवर दि. 15 एप्रिलला टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणात सुरवातीला फिर्यादी असलेल्या सराफ दुकानदार विष्णू सखाराम दहिवाळ ( रा. धायरी) यानेच बनाव रचला होता. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दुकानदार विष्णू दहिवाळ याच्यासह बनावट दरोड्याचा म्होरक्या दिलीप सुभाष मंडलिक ( वय ३२, रा. दिघी) , राजेश ऊर्फ राजु चांगदेव गालफोडे (वय ४०, रा. भोसरी) व शाम शेषराव शिंदे (वय ३७, रा. भोसरी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. दरोड्याचा म्होरक्या दिलीप मंडलिक हा दुकानदार दहिवाळ याचा नातेवाईक आहे. अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार, सहायक पोलिस निरीक्षक छबु बेरड, राहुल यादव, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलिस अंमलदार प्रशांत काकडे, सुनिल चिखले, नवनाथ वणवे, शिवा क्षिरसागर, स्वप्नील मगर, किशोर शिंदे, पुरेषोत्म गुन्ला, योगेश झेंडे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.