Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मद्यधुंद चालकाच्या धडकेत डिलेव्हरी बॉयचा मृत्‍यू

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजरोड क्रिकेटच्‍या मैदानाजवळ घडला अपघात

marathinews24.com

पुणे – ऑनलाईन शॉपींग साईच्‍या माध्यमातून घरगुती साहित्य पोहचविण्यासाठी जात असलेल्‍या डिलीव्‍हरी बॉयला मद्यधुंद वाहन चालकाने धडक दिली. धडकेत त्‍याचा मृत्‍यू झाला. हा प्रकार वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजरोड क्रिकेटच्‍या मैदानाजवळ घडला. वाहन चालक जखमी तरुणाला मदत न करताच निघून गेल्‍याने त्याचा मृत्‍यू झाला. राहुल दिनकर पवार (वय ३०, रा. मु. पो. पाटण, ता. सिंदखेडा, जि. धुळे) असे अपघाती मृत्‍यू झालेल्‍याचे नाव आहे.

केजमधील २१ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता – सविस्तर बातमी 

सोजल शामराव औटी (वय २२, रा. सेलपिंपळ गाव, आळंदी), अभिषेक संजय शिंदे (वय २१ रा. कोळणे फाटा, आळंदी) आणि विघ्नहतर्ता शामराव औटी (वय २७, रा. सेलपिंपळ गाव आळंदी, पुणे) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करून त्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा अपघात १० फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजण्याच्‍या सुमारास घडला. राहुलचा मित्र कैलास विक्रम डोईफोडे (वय ४६, रा. धायरी रोड, गोकुळनगर) याने फिर्याद दिली आहे.

तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक माधुरी काजळे यांनी सांगितले, कारमधील तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मद्यधुंद अवस्‍थेत आरोपी कार चालवत असल्ल्याचे निष्पन्न झाले आहे. तर राहुल हा मुळचा धुळे येथील रहिवासी असून मागील दोन वर्षापासून कामासाठी तो पुण्यात आला होता. डिलेव्‍हीरी बॉयचे काम करून तो स्वतःची उपजिवीका भागवत घरी पैसे पाठवत होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×