स्वारगेट अत्याचार प्रकरणात अजय मिसार यांच्यावर विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी
marathinews24.com
पुणे – स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकीलपदी ॲड. अजय सुहास मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतेच आराेपपत्र केले. एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी प्रवासी तरणीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. प्रवासी तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेल्या दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २८ फेब्रुवारीला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. बलात्कार प्रकरणाच्या तपासात गाडेविरुद्ध भक्कम पुरावे संकलित केले आहेत.
वाटर पार्क मध्ये ३० फूट उंचीवरून कोसळून संगणक अभियंता तरुणी ठार – सविस्तर बातमी
विशेष न्यायालयात गाडेविरुद्ध नुकतेच आरोपपत्र दाखल केले. स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजय मिसार यांची विशेष सरकारीपदी नियु्क्ती करण्याची विनंती पोलिसांनी विधी विभागाकडे केली होती. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच न्याय आणि विधी विभागाने मंजूरी दिली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. मिसार मूळचे नाशिकचे आहेत. त्यांनी अनेक गंभीर गुन्हे, तसेच दहशतवाद विरोधी कारवायांच्या अनुषंगाने दाखल असलेल्या खटल्यात शासनाकडून बाजू मांडली आहे, असे त्यांनी नमूद केले.