मुलीचा पाठलाग केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचा केला विनयभंग
marathinews24.com
पुणे – मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाची त्याच्या वडिलांकडे तक्रार केल्याने एका महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांकडे तक्रार दिल्यास मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला पळवून नेतो’, अशी धमकी तरुणाने महिलेला दिली. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोहम शशी चव्हाण (वय २२) आणि त्याचे वडील शशी पांडू चव्हाण (वय ६५, दोघे रा. येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर ओळखीतून तरुणीवर बलात्कार -सविस्तर बातमी
तक्रारदार महिलेच्या १६ वर्षीय मुलीचा आरोपी सोहम चव्हाण पाठलाग करुन तिला त्रास देत होता. मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर मुलीची आई चव्हाण यांच्या घरी गेली. तिने मुलाबाबत तक्रार केली. तेव्हा आरोपींनी तिला शिवीगाळ करुन धमकावले. ‘पोलिसांकडे तक्रार दिल्यास मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर तिला पळवून नेतो’, अशी धमकी त्यांनी महिलेला दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर तपास करत आहेत.