Breking News
केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे काम करत आहे – अर्णब चॅटर्जीगुरुपौर्णिमेनिमित्त श्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर राहणार खुलेPune Crime : घरासमोर पाणी सांडल्याच्या वाद, तरुणाचा खुनाचा प्रयत्नCrime News : सराफी पेढीचा दरवाजा उचकटून दीड लाखांचे दागिने चोरीलाविदेशी पतसंस्था आयटीआयमध्ये करणार १२० कोटींची गुंतवणूकवारी मार्गावर पुरविली ९ लाखांवर वारकऱ्यांना आरोग्य सेवामुंबई बेंगलोर महामार्गावर वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेची कारवाईपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनपुणे ग्रामीण जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूभुयारी मार्गात दुचाकी कोसळून तरुण जखमी

टुरिस्ट कॅब चालकाने पादचारी तरूणीला उडविले

पुण्यातील सुखसागरनगरातील घटना, चालक ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात अपघांताची मालिका कायम असून, बेदरकारपणे वाहने चालवित सर्वसामान्यांचा जीव घेतला जात आहे. मार्केटयार्डातील गंगाधाम चौकामध्ये ट्रकचालकाने महिलेला चिरडल्याची घटना ताजी असतानाच, भरधाव मोटार चालकाने पादचारी तरूणीला उडविल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कात्रजमधील सुखसागरनगर परिसरामध्ये यशश्री सोसायटीसमोर घडली आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कोंढवा पोलीस ठाणे गाठत वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टुरिस्ट कॅब चालकाने पादचारी तरूणीला उडविले

फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधली, सव्वा लाखांची चोरी – सविस्तर बातमी

श्रेया गौतम येवले (वय २१, शीतल हाईट्स, खंडोबा मंदिर जवळ कोंढवा पुणे)असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७ रा गोकुळ नगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील सुखसागरनगरमध्ये शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास टुरिस्ट मोटार चालकाने वाहनावरील (एम एच १२ यु एम ४८४७) नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार चालकाने मुख्य रस्त्यावरून पदपथानजीक नारळाचे झाड तोडून पायी चालत निघालेल्या श्रेया येवले हिला जबर धडक दिली.

मोटार आणि नारळाच्या झाडात अडकल्यामुळे श्रेयाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. मोटार चालक सतीश होनमाने याला ताब्यात घेतले. अपघाताच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top