पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू

पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू

पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडली. याप्रकरणी बस चालाकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नितीन अमृतलाल शहा (वय ६३, रा. आयविन थ्रीज्वेल्स सोसायटी, टिळेकरनगर, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर नितीन शहा (वय ३६) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टोळक्याकडून पिता पुत्राला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शहा हे ७ फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून निघाले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात पीएमपी बसने शहा यांना धडक दिली. बसच्या धडकेत शहा हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×