Breking News
Akshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण

महिला रुग्णालयाच्या वर्गवारीमध्ये बारामती महिला रुग्णालयास दुसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार

महिला रुग्णालयाच्या वर्गवारीमध्ये बारामती महिला रुग्णालयास दुसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार

एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये ४ हजार ४५३ प्रसूती; वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित

marathinews24.com

बारामती – बारामती महिला रुग्णालयाने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये नैसर्गिक प्रसूती २ हजार २१४,सिझेरीयन प्रसुती २ हजार २३९ अशा एकूण ४ हजार ४५३ प्रसूती करुन ग्रामीण भागातील महिलांना दिलासा आहे. तसेच बाह्यरुग्ण विभाग ३७ हजार ३३४, आंतररुग्ण विभाग ११ हजार ६२५, खाटा आरक्षित प्रमाण १०३.९६ टक्के, मोठ्या शस्त्रक्रिया २ हजार ३९०, लहान शस्त्रक्रिया २ हजार १४६ करण्यात आल्या आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक संपन्न – सविस्तर बातमी 

याकरिता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे रुग्णालयात आरोग्य सुविधा बळकटीकरणासोबत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. तसेच पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ नागनाथ यम्पल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरु आहे.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ करिता एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या कामगिरीनुसार दरमहा मुल्यमापन करण्यात येते. सार्वजनिक आरोग्य विभागाचे ठरवलेल्या निकषानुसार पुरस्काराकरिता रुग्णालयाची निवड करण्यात येते. महिला रुग्णालय प्राप्त गुण अमरावती जिल्हा महिला रुग्णालयास २१.२ गुण मिळाले असून प्रथम क्रमांक तर बारामती महिला रुग्णालयास २१ गुण मिळवून दुसरा क्रमांक तर नागपूर जिल्हा महिला रुग्णालय डागा २० गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये महिला रुग्णालयाच्या वर्गवारीमध्ये “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ महिला रुग्णालयास प्राप्त झाला आहे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृह, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बापू आनंदराव भोई यांनी पुरस्कार स्विकारला.

डॉ. नागनाथ यम्पल्ले, जिल्हा शल्यचिकीत्सक : बारामती येथील महिला रुग्णालयामध्ये पुणे मंडळामध्ये महिलांची सर्वात अधिक प्रसुती होतात, सर्व मातांना उच्च व दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जातात. राज्यामध्ये महिला रुग्णालय दुसऱ्या क्रमांकांचा पारितोषिक पटकाविला असून आमच्याकरिता आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

डॉ. बापू आनंदराव भोई, वैद्यकीय अधिक्षक : महिला रुग्णालयात आलेल्या रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सेववा उपलब्ध होईल, याकरिता सातत्याने प्रयत्नशील आहोत. आगामी कालावधीमध्ये सर्व गरोदर मातांना उत्कृष्ट दर्जेच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×