Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

गुंतवणूकीच्या आमिषाने १५ लाखांचा गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींग कंपनीचे एजंट असल्याचे भासवून गुंतवणूकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल १४ लाख ६८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २९ जानेवारी ते ११ फेबु्रवारी २०२६ कालावधीत सिंहगड रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या भांडणातून तरूणाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रोड परिसरात राहायला असून, २९ जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला होता. शेअर ट्रेडींग कंपनीचे एजंट असल्याचे भासवून गुंतवणूकीच्या आमिषाने त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानुसार तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात करीत तब्बल १४ लाख ६७ हजारांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×