Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

जुन्या भांडणातून तरूणाला बेदम मारहाण

बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल

६ जणांविरूद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणाला बेदम मारहाण करीत त्याच्या हातावर वार केला आहे. ही घटना २२ फेबु्रवारीला रात्री अकराच्या सुमारास अपर बिबवेवाडीतील सदगुरूनगरात घडली आहे. याप्रकरणी सहाजणांविरूद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुमार बाळकृष्ण खुडे (वय ३० रा. अपर बिबवेवाडी )असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार ६ जणांविरूद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीचा आरोप केल्याने धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुमार खुडे अप्पर बिबवेवाडीत राहायला असून, आरोपी आणि त्याची काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच रागातून टोळक्याने २२ फेबु्रवारीला खुडेला अडवून विचारणा केली. त्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत खुडे जखमी झाला असून, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×