Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

चोरीचा आरोप केल्याने धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली घटना

marathinews24.com

पुणे – चोरीचा आरोप केल्याने तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अहिरे याच्या भावाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघा्ंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा कारागृहात ५ मोबाइल, पाॅवर बँक सापडली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल अहिरे खासगी ठिकाणी कामाला होता. आरोपींनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला. आरोपींनी त्याला मारहाण करुन शिवीगाळ केली होती. मारहाण, तसेच चोरीचा आरोप केल्यानंतर अतुल नैराश्यात होता. मानसिक तणावाखाली त्याने २३ फेब्रुवारी राोजी मध्यरात्री पुणे ते काेल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आरोपींची धमकी, तसेच मारहाणीमुळे भावाने आत्महत्या केल्याची फिर्याद नुकतीच देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×