Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

येरवडा कारागृहात ५ मोबाइल, पाॅवर बँक सापडली

येरवडा जेल

कारागृह प्रशासनाकडून विशेष मोहिम

marathinews24.com

पुणे – राज्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या येरवडा कारागृह प्रशासनाने विशेष तपासणी मोहिम राबविली. कारागृहाच्या परिसरात झडती घेण्यात आल्यानंतर बराकीत ५ मोबाइल, दोन पाॅवर बँक, चार्जिंग वायर सापडली आहे. कारागृहाच्या आवारात मोबाइल सापडल्यामुळे कैदी मोबाइलचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गरजूंसाठी ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’ करतेय अवघ्या पाच रुपयात तपासणी, औषधोपचार – सविस्तर बातमी 

कैदी नौशाद बद्रुद्दीन शेख याच्यासह अन्य कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यत आला आहे. सहायक तुरुंगाधिकारी सुनील गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी येरवडा कारागृहात गायकवाड हे नियमित गस्त घालत होते. त्यावेळी कारागृहातील भिंतीजवळ असलेल्या स्वच्छतागृहाजवळ कैदी थांबला होता. त्याच्या संशयास्पद हालाचली गायकवाड यांनी टिपल्या. शेखची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने जमिनीवर मोबाइल पडल्याचे सांगितले. उडवाउडवीची उत्तरे देऊन तो बराकीत गेला. त्यानंतर गायकवाड यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला. त्यानंतर २२ फेब्रुवारीला दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली.

बराक क्रमांक एकमधील कैदी नौशाद शेख राहत असलेल्या बराक क्रमांक एकची झडती घेण्यात आली. तेथे ठेवलेल्या पिश‌वीची तपासणी करण्यात आली. तेव्हा तपासणीत मोबाइल, बॅटरी, सीमकार्ड, चार्जिंग वायर सापडली. त्यानंतर बराक क्रमांक एक, दोन, सहाची झडती घेण्यात आली. चार मोबाइल , बॅटरी, दोन पाॅवर बँक सापडल्या.

कारागृहात मोबाइल वापरास बंदी असताना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×