Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाखांचा साठा जप्त

गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाखांचा साठा जप्त

अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई

marathinews24.com

पुणे – अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे कार्यालयास प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांवर धडक कारवाई करण्यात आली. त्यादृष्टीने ९२ लाख ९८ हजार ८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पीएमपीएलच्या नावाने बनावट अ‍ॅप्लीकेशन – सविस्तर बातमी 

पहिल्या कारवाईत में. आझमी वेट ब्रिज, गट नं. ५७४/२०१६, महाळुंगे एमआयडीसी, ता. खेड, जि. पुणे येथे विक्री व वितरणासाठी साठवून ठेवलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या ठिकाणी बोलेरो मॅक्स पिकअप वाहनासह एकूण ७९ लाख १७ हजार १३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहन मालक सिराज नूर आलम व अज्ञात जागा मालक यांच्या विरोधात महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दुसऱ्या कारवाईत आनंद सेल्स, थेरगाव, पिंपरी-चिंचवड येथे गुटखा व पान मसाला वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. त्यावेळी १३ लाख ८० हजार ९५० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. वाहन मालक प्रज्वल सुदर्शन मुथा व रामस्वरूप यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सदर कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यास प्रशासनास कळवावे, असे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×