Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

कोयते उगारून दहशत माजविणारे टोळके गजाआड

अरण्येश्वरमध्ये तरूणावर वार, एकाला अटक

टोळक्याला पर्वती पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – कोयते उगारून दहशत माजविणार्‍या टोळक्याला पर्वती पोलिसांनी अटक केली. टोळक्याकडून कोयते जप्त करण्यात आले. प्रेम अर्जुन ढावरे (वय २०), किरण येडबा झोंबाडे (वय २१) पंकज सुभाष पवार (वय २१), आकाश चंद्रकांत गायकवाड (वय २२, सर्व रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती), किरण सुरेश कुर्ले (वय १९, रा. जनता वसाहत, पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी नानासाहेब खाडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गांजा बाळगणारा रिक्षा चालक अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती भागातील शाहू वसाहतीत आरोपी ढावरे, झोंबाडे, पवार, गायकवाड, कुर्ले हे रविवारी ( १ मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरुन आले. त्यांच्याकडे कोयते होते. रामराज्य मंडळाजवळ आरोपी दुचाकीवरुन उतरले. त्यांनी कोयते उगारून दहशत माजविली. नागरिकांनी शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×