Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

जुन्या वादातून अल्पवयीनावर वार, तिघांना अटक

पर्वती परिसरात तरुणाला वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन मारहाणधाकाने लुटले

पुण्यातील दांडेकर पुलावरील घटना

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने अल्पवयीनावर वार करून त्याला गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना २ मार्चला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ घडली आहे. याप्रकरणी १७ वर्षीय मुलाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार टोळक्याविरूद्ध गुन्हा दाखल करीत तिघांना अटक केली आहे.

रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने १६ जणांची फसवणूक – सविस्तर बातमी 

आकाश महादेव सुर्यवंशी (वय २० रा. दांडेकर पुल) अथर्व नीलेश भालशंकर (वय १९, रा. दांडेकर पुल, सिंहगड रोड) आदेश सुरेश म्हस्के (वय १९ रा. दांडेकर पुल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १७ वर्षीय मुलगा आणि आरोपींमध्ये काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातून २ मार्चला आरोपींनी तक्रारदाराला दांडेकर पुल परिसरात गाठले. त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. हल्ल्यानंतर टोळके पसार झाले होते. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी तिघांचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक इसराईल शेख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×