Breking News
उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडापुण्यात रिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरूणाला बेदम मारहाणमेंहदीच्या कार्यक्रमात टोळक्याने एकाला लुटलेकाय सांगता…बंगल्यात केली गांजाची लागवड‘भारताची भीमज्योत’ बाबासाहेबांचे संविधान मजबूत करणारीवृक्षसंवर्धन आणि फिटनेसचा संगम, प्रसारासाठी विशेष उपक्रम

पुण्यात घरफोडी करणारे ‘गँगस्टर’ जेरबंद; ६२ लाखांचे दागिने जप्त

पुण्यात घरफोडी करणारे ‘गँगस्टर’ जेरबंद; ६२ लाखांचे दागिने जप्त

विश्रामबाग पोलिसांची कारवाई; उत्तर प्रदेशातील गुन्हेगाराचा पर्दाफाश

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या आणि उत्तर प्रदेशात गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ६२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. हे दोन्ही गुन्हेगार आंतरराज्यीय ‘सनी’ गँगचे साथीदार आहेत. त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न आणि खंडणीचे अनेक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल आहेत. आरोपी परराज्यात घरफोडी करायला जाताना विमान किंवा रेल्वेचा प्रवासासाठी वापर करत होते.

जुन्या भांडणातून दोघांवर खुनी हल्ला; चौघांना अटक – सविस्तर बातमी 

आकाश सुभाष ( २३ मूळ रहिवासी मेरठ, उत्तर प्रदेश सध्या सुंदरनगरी, दिल्ली) आणि जितेंद्र चतुर्वेदी ( ३२ सुंदरनगरी, दिल्ली) अशी अटक आरोपींची नावे आहे विश्रामबाग पोलीस ठाण्यात जानेवारी महिण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी घरात नसताना अज्ञात आरोपींनी दरवाजा तोडून घरफोडी केली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना आदेश दिले.

तपास पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. पोलीस अंमलदार आशिष खरात आणि अनिस शेख यांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले असता, आरोपी पुण्यातील विविध भागांत घरफोड्या करत असल्याचे समोर आले. आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येऊन लॉजमध्ये थांबले होते.. त्यानंतर परराज्यात निघून गेल्याचेही तपासात उघड झाले..दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. जवळपास महिनाभराच्या तपासानंतर माहिती मिळाली की, सीसीटीव्हीत दिसलेले आरोपी पुन्हा घरफोडीच्या उद्देशाने विश्रामबाग परिसरात आले असून ते ओंकारेश्वर मंदिराजवळ थांबले आहेत. तपास पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना चारही बाजूंनी घेरून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेले दागिने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून ३२ तोळे सोने आणि १२५ ग्रॅम चांदी हस्तगत केली.तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी आकाश सुभाष हा उत्तर प्रदेशातील ‘सनी गँग’शी संबंधित असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि गँगस्टर ऍक्टअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपींना न्यायालयात हजर केले असता ६ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात आरोपींनी पुणे शहरात विश्रामबाग, समर्थ, खडक आणि भोसरी पोलीस ठाणे हद्दीत पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात सुमारे ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जन थोरात, नितीन बाबर आणि अर्जुन कुडाळकर यांनी केली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×