Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

जुन्या भांडणातून दोघांवर खुनी हल्ला; चौघांना अटक

१० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात रिलस्टारला बेड्या

धनकवडीतील घटना

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दोघांवर खुनी हल्ला केल्याची घटना ३ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास धनकवडीतील शंकर महाराज मठासमोरील पुलाजवळ घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. अनिल मारूती साळुंखे (वय ३५) दीनेश अरूण शेंडगे (वय ४६) नीलेश अरूण शेंडगे (वय ३८) आणि यश उर्फ बाल्या दीनेश शेंडगे (वय १९ सर्व रा. धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी ४३ वर्षीय नागरिकाने सहकानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

भांडणात मध्यस्थी करणार्‍याला केली मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धनकवडीत राहायला असून, त्यांची काही दिवसांपुर्वी आरोपींसोबत भांडणे झाली होती. त्याच रागातून टोळक्याने ३ मार्चला फिर्यादीसह त्यांच्या मित्राला शंकर महाराज मठाजवळ गाठले. त्याठिकाणी त्यांच्यावर लोखंडी रॉडसह, बांबू, फरशीच्या तुकड्याने खुनी हल्ला केला. हल्ल्यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर टोळके पसार झाले होते. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×